नक्षत्रांचे वृक्ष आणि दान - थोडे विवेचन
नक्षत्र अशुभ असल्यास, किंवा नक्षत्रात अशुभ ग्रह असल्यास, किंवा नक्षत्रावरुन दिग्दर्शित होणारा आजार असल्यास; नक्षत्राच्या आराध्यदेवतेची उपासना; नक्षत्राच्या आराध्यवृक्षाची सेवा ( जसे वृक्षास जल देणे; वृक्षाचे पंचांग म्हणजे, मुळ, खोड, पान, फुल किंवा फळ जवळ बाळगणे); नक्षत्राच्या दिवशी संकल्प करुन नक्षत्राचे दान देणे आदि उपाय सांगितले आहेत.
अतिव्यापारीकरणामुळे लोकांचा ज्योतिषशास्त्रावरील विश्वास उडाला आहे. वरील विवेचन सिद्ध करण्यासाठी उदाहरण म्हणजे, वृषभ राशीत भरणी नक्षत्र येते. वृषभेच्या व्यक्ती खाण्यापिण्याच्या शौकिन असतात.अतिखाण्यामुळे मधुमेह होऊ शकतो.रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष जांभुळ आहे. आयुर्वेदात जांभुळाच्या फळाचे किंवा फळाच्या बीच्या चुर्णाचे सेवन, हे मधुमेहावर औषध सांगितले आहे.
दुसरे उदाहरण म्हणजे, मेष राशीत भरणी नक्षत्र येते. भरणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आवळा आहे. मेष राशीतील व्यक्तींना अग्नितत्वाच्या प्राबल्यामुळे ( रासही अग्नितत्वाची आणि राशीस्वामी मंगळही अग्नितत्वाचा असल्यामुळे ) पित्तविकार असतात. आवळा हे पित्तविकारांवर रामबाण औषध आहे.
तिसरे उदाहरण म्हणजे, कुंभ राशीचे शेवटचे तीन चरण व मीन राशीचा पहिला चरण, यात पुर्वाभाद्रपदा नक्षत्र येते. मकर आणि कुंभ राशीतील व्यक्तींना संतती होतच नाही अशातला भाग नाही. पण मकर आणि कुंभ राशीच्या आणि कुंभ राशीतील बर्याच व्यक्तींना अल्पवीर्यतेचा त्रास असतो. कारण मकर आणि कुंभेचा स्वामी शनी हा नपुंसक मानला गेला आहे. आयुर्वेदात आंब्याच्या फळाचे सेवन हे या आजारावर औषध सांगितले गेले आहे.
वरील सांगितलेले आजार हे सार्वत्रिक आहेत आणि इतर राशीच्या व्यक्तींनी हे आजार असल्यास, त्या आराध्यवृक्षाचे औषध घेऊ नये, असा त्याचा अर्थ होत नाही. तीच गोष्ट आराध्यदेवतेची) . त्या त्या नक्षत्रात त्या त्या आजाराचे प्राबल्य असते, एवढाच त्याचा अर्थ आहे.
काही शास्त्रज्ञ, Rationalist (विवेकवादी) आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ज्योतिषशास्राला थोतांड ठरवतात. ते कसे निखालस खोटे आहे, हे वरील विवेचनावरुन लक्षात येईल.
Comments
Post a Comment