ज्योतिषशास्त्र आणि मानसशास्त्र तसेच ग्रहांच्या देवता व दान

चंद्रावर शनीची दृष्टी असेल तर शनीचे जे नैसर्गिक गुण आहेत ते म्हणजे जातकाला नैराश्य व चिंता असते. चंद्रावर मंगळाची दृष्टी असेल तर जातकाला मत्सर, टीका आणि तीव्र स्पर्धा सहन करावी लागते. चंद्रा शेजारी राहू किंवा केतू असतील तर अनामिक भय उत्पन्न होते.


अशावेळी तो ग्रह म्हणजे मंगळ, शनी, राहू, केतू ज्या नक्षत्रात असतील त्या नक्षत्र देवतेची उपासना केल्यास किंवा त्या नक्षत्राचे दान त्या त्या नक्षत्र दिवशी दिल्यास अशुभ परिणामांची तीव्रता खूपच कमी होते.


ग्रह पीडित, दुर्बळ किंवा अशुभ असेल तर त्या ग्रहावरून जे दैवत बघितले जाते, त्या देवतेची उपासना केल्यास किंवा त्या ग्रहाचे दान दिल्यास अशुभ परिणामांची तीव्रता बरीच कमी होते.


अ.क्र.  - ग्रह -  देवता - दान

१.- सुर्य - सुर्य, गायत्री - गहु

२. चंद्र - शिव, वरुण (जलदेवता)- दुध, पाणी, तांदुळ

३. मंगळ- गणपती, हनुमान, मंगलचंडिका (मंगळागौर) - गुळ

४.बुध - विष्णु, गणपती (बुद्धीची देवता) - मुग, हिरव्या भाज्या.

५. गुरू - दत्त, सद्गुरु - चणाडाळ, साखर

६. शुक्र - देवी (लक्ष्मी, सरस्वती इ.) - तांदुळ

७. शनी- शनी, हनुमान, काळभैरव - तेल

८. राहु - काळभैरव - तेल

९. केतु - गणपती - तेल




Comments

Popular posts from this blog

MODEL NAME: Human-Centric Mixed Economy (HCME)

🌟 फलज्योतिष: शास्त्र, श्रद्धा की मानसिक आधार? – एक समतोल अभ्यास

How to Stop Worrying and Start Living" – डेल कार्नेगी यांचे चिंतामुक्त करणारे पुस्तक