गुडघेदुखी
चाळिशी आली की गुडघेदुखीला सुरुवात होते. गुडघ्याच्या स्नायुंवर आणि सांध्यांवर सतत पडत असलेला ताण हे त्यामागचे कारण असते. योगासने करताना एकमेकांना पुरक असलेली आसने एकापाठोपाठ एक केली जातात. म्हणजे पहिले आसन करताना शरीराच्या ज्या भागावर ताण असतो, त्याच भागावर दाब येईल, असे दुसरे आसन पहिल्या आसनानंतर केले जाते. त्यामुळे शरीराचा तो भाग लवचिक ( Flexible) राहतो. सतत उभे राहिल्यामुळे किंवा चालल्यामुळे गुडघ्यांवर ताण येऊन ते दुखु लागतात. यावर उपाय म्हणजे, जमिनीवर प्रथम मांडी घालुन बसावे. नंतर, हात जमिनीवर पुढे टेकुन गुडघ्यांवर ओणवे व्हावे.(लहान मुलांना बाबागाडी खेळवताना ज्याप्रमाणे झुकतो, त्याप्रमाणे). गुडघ्यांवर दाब येऊन बरे वाटु लागेल. थोडावेळ त्याच स्थितीत चालावे. थोडे दिवस सवय झाल्यावर हातांचा आधार सोडुन गुडघ्यांवर उभे राहावे. खुपच बरे वाटु लागेल. थोड्या दिवसांनी यापुढची स्थिती म्हणजे नंतर तळपाय हातांनी वर खेचुन गुडघ्यांवर उभे राहु शकाल. पण ही पार पुढची स्थिती झाली. ज्यांची गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांनी डाॅक्टरी सल्ल्याने हा उपाय करावा. असे करता करता तुमची गुडघेदुखी पार पळुन गेलेली तुम्हाला आढळुन येईल.
Comments
Post a Comment