सकारात्मक संकल्प

घंटाळी मित्र मंडळाचे (सहयोग मंदिर, ठाणे) योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे (अण्णा) शवासन सांगताना एक संकल्प देतात. परंतु हा संकल्प जर स्वयंसुचनेप्रमाणे वारंवार मनाशी म्हणत राहिल्यास निश्चितपणे तो अंतर्मनात जातो आणि त्याची चांगली फळे मिळतात.  या संकल्पाने  गुन्हेगार सुधारलेले आहेत. आत्मविश्वास नसलेल्यांना आत्मविश्वास मिळालेला आहे. संकल्प म्हणतानाच मनाला बरे वाटु लागते. संकल्प पुढीलप्रमाणे ः


"प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती याक्षणी मला प्राप्त होत आहे आणि या आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या बळावर आयुष्यात येणार्‍या कोणत्याही प्रसंगाला मी सामोरा जाऊ शकतो \ शकते…...मला खुप बरं वाटतेय…..हलकं हलकं…..मोकळं मोकळंं….आणि हा हलकेपणा, हा मोकळेपणा….हा जोम आयुष्यभर टिकणार आहे. येथुन पुढे मी माझं आयुष्य आनंदाने आणि समाधानाने व्यतीत करणार आहे."


हा संकल्प मनाशी स्वयंसुचनेप्रमाणे वारंवार म्हणावा. झोपताना म्हटल्यास मनावरचा ताण एकदम हलका होतो आणि शांत झोप लागते.


Comments

Popular posts from this blog

MODEL NAME: Human-Centric Mixed Economy (HCME)

🌟 फलज्योतिष: शास्त्र, श्रद्धा की मानसिक आधार? – एक समतोल अभ्यास

How to Stop Worrying and Start Living" – डेल कार्नेगी यांचे चिंतामुक्त करणारे पुस्तक