अतिरेकी भांडवलवालवादाचे समाजावर होणारे परिणाम

      भांडवलशाही गुंतवणुकदारांनी व्यवस्थापनावर टाकलेला दबाव आणि व्यवस्थापनाने कर्मचार्‍यांवर टाकलेला दबाव यामध्ये संपूर्ण समाज भरडला जात आहे.अमर्याद स्पर्धा करुन नफेखोरी करायची की समाजहितवादी व्यवसाय करुन लोकांचा आदर मिळवायचा, हे या भांडवलशाही गुंतवणुकदारांनी ठरवावे.

 Time, Energy आणि Money ची गुणोत्तरे मांडुन Multi- Tasking आणि Efficiency ची गणितं मांडली जात आहेत. Computer सुद्धा Multi-Tasking करून Slow होतो. माणसांना तर मनं आहेत.मन लावुन कामं करणे, कामाचा आनंद घेणे आणि सहकार्याने कामं करणे हे राहिलं बाजुलाच ! उलट ऑफिसमध्ये आणि समाजामध्येसुद्धा धर्म, जात, पंथ, संप्रदाय, प्रांत, शिक्षण यावरुन राजकारणं सुरु असतात.

माणसांना यंत्र समजणे याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे सध्याचे काॅल सेंटरचे कार्य ! मिनिट ते मिनिट आणि सेकंड  ते सेकंड कर्मचार्‍यांच्या Performance वर Watch ठेवुन  त्यांचा मानसिक छळ केला जातो. ते त्यांचा मानसिक उद्वेग बोलुन पण दाखवु शकत नाही. कारण चुकुन बटन उघडं राहिलंच तर ते सगळं Record होत असतं. व्यवस्थापन आणि कर्मचार्‍यांवर दबाव टाकताना त्यांच्या मानसिक स्थितीचा कोणताच विचार केला जात नाही.


 एकीकडे काही लोकांचे भरमसाठ पगार आणि काही लोकांचे तुटपुंजे पगार, यामुळे समाजात प्रचंड विषमता, शोषण आणि गुन्हेगारी निर्माण होत आहे. कुठल्याही (चांगल्या किंवा वाईट) गोष्टींचा धंदा करायचा आणि कर्मचार्‍यांवर दबाव टाकायचा. मग कर्मचार्‍यांनी ते Targets पूर्ण करण्यासाठी समाजाची फसवणुक करायची. वैद्यकीय व्यवसाय याचं उत्कृष्ठ उदाहरण.  डाॅक्टर्स, Pharma कंपन्या, Testing Labs  आणि Insurance कंपन्या यांचं एक साटंलोटं असते. मग त्यात सामान्य रुग्ण आणि कर्मचारी भरडला जातो.


दुसरं उदाहरण म्हणजे कर्जाचा बाजार. तुटपुंज्या उत्पन्नामुळे लोकांना विविध कारणासाठी कर्ज घ्यावी लागतात आणि मग ते मुद्दल दामदुपटीच्या व्याजासकट फेडावे लागते. हे कर्ज ज्यांना वसुल करावे लागते, त्यांनाही वारंवार फोन करुन आणि अक्षरक्षः ग्राहकांचा मानसिक छळ करुन ते वसुल करावे लागते. या सगळ्या समाजात पसरलेल्या विषवल्लीचे कारण, समाजातील सर्वात वरच्या अतिश्रीमंत व्यक्तींकडील अतिरिक्त पैसा, जो कर्जाऊ दिला जातो आणि त्यावर दामदुपटीने व्याज वसुल केले जाते. 


       समाजात प्रचंड प्रमाणात पसरलेली विषमता, गरिबी आणि परिस्थितीमुळे गुन्हेगारी आणि शरीरविक्रयाच्या व्यवसायात ओढली जाणारी मुले-मुली आणि प्रचंड प्रमाणात पसरलेले चिंता, नैराश्य आणि इतर गंभीर मनोविकार या सगळ्यांना त्यांची मागच्या जन्माची पापं जबाबदार आहेत की यांच्याच भाषेत या लोकांच्या आसुरी वासना जबाबदार आहेत ?

      Perform or Perish हे या भांडवलशाही विचारवंताचं आवडतं तत्व. कर्मचारी जमेल तितके Perform करण्याचा प्रयत्न करतील. न जमल्यास नाही करणार. पण त्यांनी Perish व्हायचं की नाही ते नियती ठरवेल. भांडवलशाही गुंतवणुकदारांनी त्याची चिंता करु नये.

Comments

Popular posts from this blog

MODEL NAME: Human-Centric Mixed Economy (HCME)

🌟 फलज्योतिष: शास्त्र, श्रद्धा की मानसिक आधार? – एक समतोल अभ्यास

How to Stop Worrying and Start Living" – डेल कार्नेगी यांचे चिंतामुक्त करणारे पुस्तक